Latest
Vijay Wadettiwar : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी
पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने जीवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. धमकीचा मॅसेज आल्यानंतर वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र लिहून सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.

