मला जीवे मारण्याच्या हेतूनेच घरावर हल्ला : आमदार प्रकाश सोळंके | पुढारी

मला जीवे मारण्याच्या हेतूनेच घरावर हल्ला : आमदार प्रकाश सोळंके

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मला जीवे मारण्याच्या हेतूनेच माझ्या घरावर हल्ला झाला. हल्लेखोरांकडे घातक शस्त्रे, पेट्रोल बॉम्ब आणि मोठे दगड होते. हल्लेखोरांमध्ये मराठा समाजातील लोकांबरोबरच इतर समाजांतील लोकही होते. माझ्या राजकीय विरोधकांचा आणि त्यांच्या शैक्षणिक संस्थेत काम करणार्‍या काही शिक्षकांचाही त्यामध्ये समावेश होता, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी गुरुवारी केला.

सीसीटीव्ही फुटेजवरून हल्लेखोरांची ओळख पोलिसांना पटली आहे. मी स्वतः त्यातील काही जणांना ओळखले आहे. या प्रकरणाला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, सरसकट कारवाई करू नये, अशी सूचना आपण केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझ्या ऑफिसचे आणि घराचे हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे, तरीही मी अद्याप तक्रार केलेली नाही,?असे त्यांनी सांगितले.

 

 

Back to top button