Supriya Sule: महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर; सुप्रिया सुळेंनी सरकारला सुनावले | पुढारी

Supriya Sule: महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर; सुप्रिया सुळेंनी सरकारला सुनावले

पुढारी ऑनलाईन डेस्क: मुंबईतील हिरे उद्योग आता पूर्णपणे गुजरातला जात आहे. मुंबईतील सुरत डायमंड बोर्स या इमारतीत अनेक हिरे व्यापारी स्थलांतरित होत आहेत. महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपले उद्योग धोरण कुठे चुकतेय यांचा आढावा घ्यावा, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनावले आहे. ( Supriya Sule)

राज्यातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग राज्याबाहेर जात असून, मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजप कडून सातत्याने प्रयत्न होत आहे. सरकारच्या या अशा कचखाऊ वृत्तीमुळे या राज्यातील तरुणांच्या हक्काचा रोजगार राज्याबाहेर जात ही खेदाची बाब आहे, असे देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ( Supriya Sule)

हेही वाचा:

Back to top button