कंत्राटी नोकरभरती विरोधात मंत्रालयासमोर निदर्शने | पुढारी

कंत्राटी नोकरभरती विरोधात मंत्रालयासमोर निदर्शने

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांपाठोपाठ राज्य सरकारने इतर विभागांतीलही सर्व पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्याचा निर्णय घेतल्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचार्‍यांनी बुधवारी मंत्रालयाच्या गेटसमोर निदर्शने केली.

महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण म्हणाले, कंत्राटी नोकरभरतीच्या माध्यमातून आठ ते दहा महिनेच रोजगार मिळणार असल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढणार आहे. अशा कर्मचार्‍यांवर कामाची जबाबदारी सोपविणे धोक्याचे ठरणार आहे. शिवाय, प्रशासनात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या तरुणांची ही एकप्रकारे थट्टाच म्हणावी लागेल, अशी खंत पठाण यांनी व्यक्त केली.

 

Back to top button