अजित पवारांना सोबत घेऊन भाजपनं मर्यादाच ओलांडली, मनसेची पोस्ट चर्चेत | पुढारी

अजित पवारांना सोबत घेऊन भाजपनं मर्यादाच ओलांडली, मनसेची पोस्ट चर्चेत

मुंबई ; पुढारी आनलाईन डेस्क : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकाच्या पाश्वभूमीवर मनसे पक्ष प्रबळ असून मराठी माणसाचा बुलंद आवाज ‘राजसाहेब ठाकरे’ आहेत. आगामी निवडणुकीत नागरिकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एकमेव रेल्वे इंजिन हा पर्याय मतदारासाठी राहिला असून महाराष्ट्राची रेषा उंच करायचीय आहे. तसेच येत्या निवडणुकीत ते भरघोष मताधिक्याने विजयीदेखील होणार आहे. असे भाकीत करणारी आणि त्याच्या कार्याविषयी माहिती सांगणारी एक भलीमोठी पोस्ट मनसेच्या ‘X’ ( ट्विटर) वर केली आहे.

संबधित बातम्या 

या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, मराठी माणसाचा बुलंद आवाज ‘राजसाहेब ठाकरे’, गलिच्छ राजकीय चिखलातून बाहेर पडायचे असेल तर आता एकमेव रेल्वे इंजिन हा पर्याय आहे. मराठी माणसाचा बुलंद आवज दाबण्यासाठी तेव्हा राष्ट्रवादी, काँग्रेसने प्रयत्न केले. २०१४ नंतर उद्धव ठाकरे आणि भाजपने ते तसेच पुढे चालू ठेवले. भाजप -शिवसेना यांची राजकीय गणित बिघडली आणि मग एकमेकांना शह देण्यासाठी परस्पर विरोधी विचारधारा असलेल्या पक्षांच्या गळ्यात गळे घालण्यात आले असे त्यात म्हटलं आहे.

यात पुढे त्यांनी, सुरुवात भाजपने अजित पवारांना सोबत घेऊन केली, नंतर उद्धव ठाकरे तर बाळासाहेब ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढले. त्यांच्याच गोटात जाऊन बसले. मग भाजपने गलिच्छ राजकारणाचा दुसरा डाव खेळला. शिंदेंचे PA जोशी चौकशीच्या फेऱ्यात अडकले. तसे एकनाथ शिंदे आणि सहकाऱ्यांनी उडी घेऊन भाजपच्या गोटात दाखल झाले. त्यावरही भाजपचे काही समाधान झाले नाही. मग ज्या अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले त्या अजित पवारांना मंत्रिमंडळात मानाचे स्थान देऊन गलिच्छ राजकारणाची मर्यादाच ओलांडली.

मराठी मतदारा, आता मात्र तुला यातून बोध घेऊन नवनिर्माणच्या इंजिनाच्या डब्यात बसून महाराष्ट्राला यातून बाहेर काढायला तुलाच हातभार लावायला लागणार आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपल्या हक्काच्या स्थानिक पक्षाला (मनसेला ) भरभरून मतदान करून महाराष्ट्राची रेषा उंच करायची आहे. असेही त्यात म्हटलं आहे.

हेही वाचा : 

Back to top button