Eknath Shinde : शिंदे गट करणार २२ मतदारसंघांवर दावा | पुढारी

Eknath Shinde : शिंदे गट करणार २२ मतदारसंघांवर दावा

मुंबई;पुढारी वृत्तसेवा :  शिवसेनेने लढविलेल्या सर्व 22 मतदारसंघांवर शिंदे गट दावा करणार आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात जागावाटपाचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतली. या बैठकीस शिंदे गटाचे सर्व 13 खासदार उपस्थित होते. बैठकीत 2019 साली शिवसेनेकडून लढविण्यात आलेल्या 22 जागांचा आढावा घेण्यात आला. या 22 ठिकाणी शिवसेनेचा खासदार निवडून आणण्यावर भर दिला जाणार आहे. विद्यमान 13 खासदारांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे निर्देशही यावेळी शिंदे यांनी दिले. उर्वरित ठिकाणी उमेदवारीबाबत भाजप आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील. तसे बैैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीत जिंकलेल्या 18 तर पराभूत झालेल्या 4 जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

22 जागा लढवण्यावर एकमत करताना एखादी जागा बदलायची झाल्यास त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. ज्या ठिकाणी समोर राष्ट्रवादीचा उमेदवार असेल त्या ठिकाणी मुख्यमंत्री निर्णय घेतील. शिरूरच्या जागेबाबतही ते निर्णय घेणार आहेत. विद्यमान 13 खासदारांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री दौरे करणार असून, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हासंपर्कप्रमुखही नेमले जाणार आहेत.

Back to top button