मुंबई; पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या नवरात्रोत्सवात दांडिया आणि गरबा खेळायला येणारे हिंदूच हवेत. त्यामुळे आयोजकांना येणाऱ्यांचे आधारकार्ड तपासूनच त्यांना प्रवेश द्यावा. या कालावधीत लव्ह जिहादची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर घडत असल्याने आयोजकांनी ही काळजी घेण्याची संकल हिंदू समाजाची मागणी असल्याची भूमिका भाजपा आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी मांडली.
नितेश राणे यांनी आज माध्यमांशी बोलताना गरब्यातील अन्य धर्मियांच्या प्रवेशाचा मुद्दा उपस्थित केला. सकल हिंदू समाजाने गरबा आयोजकांकडे केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्याची मागणी केली आहे. या उत्सवकाळात भगवे कपडे घालून, भगवी शाल किंवा भगवी टोपी घालून येणारे आहेत. खोटे बोलून, फसवणूक करून लव्ह जिहादची प्रकरणे घडविली जातात. त्यामुळे आयोजकांनी गेटवरच आधारकार्ड तपासून गरब्यासाठी प्रवेश द्यावा, हिंदू समाजाची मागणी असल्याचे राणे म्हणाले.