Heramb Kulkarni: सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला | पुढारी

Heramb Kulkarni: सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास  शाळेतून घरी जाताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. आजारी असल्याने शाळेतून ते सुनिल कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवरून घरी येत होते. यावेळी अहमदनगर येथील रासनेनगरातील जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी त्यांची गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली. (Heramb Kulkarni)

त्यांच्या दोन्ही पायावर दोन्ही हातावर पाठीवर आणि डोक्यात रॉडने मारहाण केली. डोक्याला ४ टाके पडले आहेत. डोक्यावरचा दुसरा फटका सुनिल कुलकर्णी यांनी हाताने अडवला. त्यामुळे ते बचावले. अन्यथा डोक्यावर जबर मार बसला असता. ते रस्त्यावर पडले. त्यानंतर त्यांच्यावर सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. या प्रकरणी तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल झाला आहे. (Heramb Kulkarni)

कुलकर्णी हे सारडा विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी शाळेलगत विक्री होणार्‍या सिगारेट, तंबाखू विरोधात मोर्चे उघडत त्या टपर्‍यावर कारवाई करणे भाग पाडले. कदाचित त्याच रागातून हा हल्ला झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हेरंब कुलकर्णी हे शनिवारी दुपारी शाळेतून सावेडीतील घरी परतत होते. आजारी असल्याने सुनील कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या मोटारसायकलवर ते जात होते. रासनेनगर चौकात तिघा तरुणांनी त्यांची मोटारसायकल अडविली. लोखंडी रॉडने त्यांच्या दोन्ही पायावर मारहाण केली. रॉडचा डोक्यात बसणारा दुसरा घाव सुनील कुलकर्णी यांनी अडविल्याने ते बचावले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिसांत धाव घेत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. ज्याठिकाणी हल्ला झाला तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर कैद झाले, मात्र 48 तासांनंतरही पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे सामाजिक संघटनांनी एसपीं राकेश ओला यांनी भेट घेत त्यांना निवेदन दिले.

खा. सुप्रीया सुळे आज नगर जिल्हा दौर्‍यावर आहेत. या घटनेची माहिती त्यांना मिळताच त्यांनी एक्सवर पोस्ट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले. त्यानंतर त्या कुलकर्णी यांची भेट घेण्यासाठी सावेडीत जाणार आहेत.

48 तासांनंतरही पोलिस कोणालाच अटक करत नाहीत. सामाजिक काम करणार्‍या व्यक्तीला रस्त्यावर अडवून रॉडने जीवघेणा हल्ला करणे ही उद्विग्न करणारे आहे. शासनाने या प्रकाराकडे गांर्भीयाने पहावे.

– प्रमिला कुलकर्णी, हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नी

हेही वाचा 

Back to top button