अहमदनगर : प्रांताधिकारी, तहसीलदार टंचाई बैठकीस उपस्थित नसल्याने बाळासाहेब थोरात संतापले | पुढारी

अहमदनगर : प्रांताधिकारी, तहसीलदार टंचाई बैठकीस उपस्थित नसल्याने बाळासाहेब थोरात संतापले

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा संगमनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयात माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक होणार होती. या बैठकीचे चार दिव सापूर्वीच नियोजन झाले होते. तरी सुद्धा संगमनेरचे प्रांताधिकारी व तहसीलदार हे दोघेही प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित न राहता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीसाठी गेले हे त्यांचे वागणे बरोबर नाही, असे संतप्त होऊन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी चांगलेच तोंडसुख घेतले.

यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनामध्ये आयोजित केलेल्या टंचाई आढावा बैठकीसाठी आलेल्या माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी सर्वप्रथम प्रांताधिकारी प्रांताधिकारी आणि तहसीलदार कोठे आहेत? असे विचारले असता नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी ते दोघे ही महसूलमंत्र्यांच्या मिटींगला गेले आहेत, असे सांगितले.

आमदार थोरात म्हणाले की, वर्षातून टंचाईची आढावा बैठक एकदाच होते. चार दिवसांपूर्वी टंचाई आढावा बैठक ठरली.  संपूर्ण तालुक्यातून सरपंच उपसरपंच आले असतानाही तालुक्याचे दोन्ही प्रमुख अधिकारी मिटींगला गेले. हे अजिबात बरोबर नाही मी पण महसूल मंत्री होतो. आपण कधीच असे केले नाही. अगोदर तुमची बैठक घ्या आणि नंतर या असे मंत्र्यांनी सांगणे गरजेचे होते, असा टोला माजी महसूल मंत्री आबाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूलमंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांना लगावला.

हेही वाचलंत का?

Back to top button