NCP Party name-symbol row | खरी राष्ट्रवादी कोणाची? शरद पवार निवडणूक आयोगात दाखल | पुढारी

NCP Party name-symbol row | खरी राष्ट्रवादी कोणाची? शरद पवार निवडणूक आयोगात दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : खरी राष्ट्रवादी कोणाची? या वादाच्या पार्श्वभूमीवर आज (दि.६) शरद पवार दिल्लीतील मुख्य निवडणुक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून ‘खरी’ राष्ट्रवादी कोणाची हे निश्चित करण्यासाठी सुनावणी घेण्यात येत असल्याचे यापूर्वी दिलेल्या माहितीत स्पष्ट करण्यात आले होते. या संदर्भातील व्हिडिओ एएनआयने शेअर केला आहे. (NCP Party name-symbol row)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक चिन्हाच्या अधिकारावर निवडणूक आयोगाने आज ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद आणि पक्ष आणि चिन्हावर दावा करणारे त्यांचे पुतणे अजित पवार या दोन्ही गटांना वैयक्तिक सुनावणीसाठी बोलावले आहे. हे दोन्ही गट पक्षावर दावा करत असल्याने निवडणूक आयोगाने या दोन्ही गटांना सुनावणीसाठी बोलावले आहे. (NCP Party name-symbol row)

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह बदलण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे शरद पवार यांनी गुरुवारी (दि.५) दिल्लीत सांगितले. पक्षाचे निवडणूक चिन्ह काढले तरी कार्यकर्त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. चिन्हे बदलून लोक बदलत नाहीत. कोणती बटणे दाबायची हे लोकांना माहीत आहे. मी वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवली आणि जिंकलीही, असेदेखील शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगातील सुनावणीला हजर राहण्यापूर्वी शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. दरम्यान, या बैठकीला खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि INC CWC सदस्य गुरदीप सपल हेही उपस्थित होते. (NCP Party name-symbol row)

हेही वाचा:

Back to top button