‘आई कधी लेकराच्या ताटातले खात असते का?’ पंकजा मुंडेंची भावनिक साद | पुढारी

'आई कधी लेकराच्या ताटातले खात असते का?' पंकजा मुंडेंची भावनिक साद

मुंबई : तुम्ही सारेजण माझ्यासाठी मोठमोठ्या रकमेचे चेक जाहीर करत आहात. परंतु मी देणाऱ्याच्या भूमिकेत आहे. तुमचे चेक आणि तुमची रक्कम घेणे माझ्या स्वाभिमानी बाण्याला पटत नाही, असे सांगत ‘आई कधी लेकराच्या ताटातलं खात असते काय?’ अशी भावनिक साद भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना घातली आहे.

वैद्यनाथ कारखान्याला जीएसटी थकबाकीपोटी १९ कोटीची नोटीस ठोठावण्यात आलेली आहे. त्यावर पंकजा मुंडे यांनी आपण आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याचे म्हटले होते. त्यानंतर समर्थकांनी हे पैसे भरण्यासाठी मोठमोठ्या रकमेचे चेक सोशल मीडियातून व्हायरल केले होते. यावर पंकजा मुंडे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून समर्थकांना आवाहन केले आहे. तुमची ही रक्कम मी घेऊ शकत नाही, केवळ तुमचे प्रेम मला हवे आहे, पैसे नको, असे पंकजा मुंडे म्हणाल्या

Back to top button