भाजप आपल्या कार्यकर्त्यांना काय उत्तर देणार? : आदित्य ठाकरे

आदित्‍य ठाकरे ( संग्रहित छायाचित्र )
आदित्‍य ठाकरे ( संग्रहित छायाचित्र )
Published on
Updated on

 मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अजित पवारांना मुख्यमंत्री करायचे तर करा. याच लोकांविरोधात लढलेल्या मूळच्या भाजप कार्यकर्त्यांना बाजूला करुन वॉशिंग मशिनमधून स्वच्छ करुन लोक घेतले जात आहेत. अटल बिहारी वाजपेयी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांच्या भाजपमधल्या जुन्या लोकांना तुम्ही काय उत्तर देणार, त्यांच्यावर अन्याय का, असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणले, राज्यात आमदारांचा, नगरसेवकांच्या निधीची उधळपट्टी सुरू आहे. तर, दुसरीकडे वेदांताचा फॉक्सकॉन, एअरबस प्रकल्प बाहेर जात आहेत. सत्तेवर असलेले सरकार राज्याच्या हिताचे काम करत आहे की शेज- ारच्या राज्याच्या हिताचे काम करत आहे, या प्रश्नाचे उत्तर मिळायला हवे. वेदांता, एअरबस प्रकल्प, सरकारी रुग्णालयांतील मृत्यू याबाबत चर्चा करू. मात्र, मुख्यमंत्री पळ काढतात असा आरोपही त्यांनी केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news