पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभा लढवावी; भाजप नेतृत्वाकडून आग्रह

पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभा लढवावी; भाजप नेतृत्वाकडून आग्रह
Published on
Updated on

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात राज्यातील भाजपच्या बड्या नेत्यांना उतरविण्याची भाजपने रणनीती आखली आहे. यात माजी मंत्री पंकजा मुंडे यांना बीड तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा आग्रह भाजपकडून होत आहे. परंतु पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणूक लढविण्यास रस नसून त्या पाथर्डीतून विधानसभा निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. तर गिरीश महाजन यांनीही लोकसभा लढविण्यास नकार दिला आहे. भाजपने बड्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याचे ठरविले असले तरी काही नेते लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक नाहीत. यात पंकजा मुंडे आणि गिरीश महाजन यांचे नाव आहे.

पंकजा मुंडे यांचा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना राष्ट्रीय राजकारणात संधी देण्यात आली. परंतु त्यांचा जीव तेथे रमला नाही. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून परळी विधानसभा मतदारसंघाऐवजी पाथर्डी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. पाथर्डीत वंजारी समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे हा मतदारसंघ त्यांच्यासाठी सुरक्षित आहे. सध्या तेथे भाजपच्या आमदार आहेत. समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे हे परळीतून लढतील तर पंकजा मुंडे या पाथर्डीतून लढतील, असा अलिखित करार मुंडे भाऊ-बहीण यांच्यात झालेला आहे.

मात्र भाजपच्या नेतृत्वाने पंकजांना बीडमधून निवडणूक लढण्यास सांगितले आहे; तर धनंजय मुंडे हे पंकजाला पाथर्डीतून उमेदवारी मिळावी, यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये शब्द टाकत आहेत. विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांनाच पुन्हा उमेदवारी द्यावी, यासाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास सांगण्यात आले आहे. पण त्यांनीही नकार दिला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार समाजाचे आहेत. रावेरमध्ये लेवा पाटील समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे तेथून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी द्यावी, अशी भूमिका गिरीश महाजन यांनी पक्षाच्या नेतृत्वाकडे मांडली आहे. त्यामुळे अद्याप बावर निर्णय झालेला नाही.

चंद्रपूरमधून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उभे केले जाणार आहेत. ते निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिंदे गाने मागितला होता. परंतु ही जागा भाजप लढविणार आहे. माजी आमदार प्रमोद जठार यांचे नाव चर्चेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news