Mumbai News : शिवाजी पार्कच्या स्विमिंग पूलमध्ये चक्क मगरीचे पिल्लू !

Mumbai News : शिवाजी पार्कच्या स्विमिंग पूलमध्ये चक्क मगरीचे पिल्लू !
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  नदी, मोठ्या तलावांमध्ये मगर आढळल्याचे आपण अनेकदा ऐकले असेल, पण मंगळवारी चक्क दादर शिवाजी पार्क येथील महात्मा गांधी जलतरण तलावामध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास मगरीचे पिल्लू दिसून आले. त्यामुळे या स्विमिंगमध्ये येणाऱ्या दादरकरांसह कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. ही मगर बाजूलाच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ही मगर नेमकी कुठून आली, याचा शोध पालिकेकडून घेतला जात आहे.

दादर, शिवाजी पार्क, वीर सावरकर मार्गालगत मुंबई महानगरपालिकेचा महात्मा गांधी ऑलिंपिक जलतरण तलाव आहे. या तलावामध्ये जलतरण करण्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून अनेक नागरिक येतात. नागरिक येण्यापूर्वी या तलावाची कर्मचाऱ्यांकडून पूर्णपणे पाहणी करण्यात येते. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास कर्मचारी तरण तलावाची पाहणी करत असताना या तलावात मगरीचे पिल्लू पोहत असल्याचे दिसून आले. या पिल्लाची माहिती कर्मचाऱ्यांनी अन्य अधिकान्यांना सांगताच, सर्वांची धावपळ उडाली. ही माहिती दादरमध्ये वान्यासारखी पसरतात अनेकांनी मगर पाहण्यासाठी गर्दी केली. या स्विमिंग पूलमध्ये दररोज पोहण्यासाठी येणाऱ्या दादरकरांची तर अक्षरशः बोबडी वळली. अखेर तज्ञांच्या मदतीने हे पिल्लू सुरक्षितपणे पकडण्यात आले आहे.

जलतरण तलावात मगरीचे पिल्लू सापडल्याची माहिती तातडीने वनखात्याला देण्यात आली. त्यामुळे वन खात्याची एक टीम तातडीने दाखल झाली. अखेर पिल्लाची वैद्यकीय तपासणी करून ती वन अधिका-यांच्या ताब्यात देण्यात आल्याचे जलतरण तलाव व नाट्यगृहांचे समन्ययक संदीप वैशंपायन यांनी सांगितले. या अगोदर या जलतरण तलावाच्या बाजूला अजगरही सापडला होता. या जलतरण तलावाच्या बाजूला एक छोटे प्राणीसंग्रहालय आहे. या प्राणीसंग्रहालयातून ही मगर आल्याचे बोलले जात आहे. मात्र ही मग नेमकी कुठून आली, याची चौकशी करण्यात येणार असल्याचे उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी सांगितले.

खासगी प्राणी संग्रहालयातून आली मगर

या जलतरण तलावाच्या बाजूला असणाऱ्या एका खाजगी प्राणी संग्रहालयातूनच ही मगर जलतरण तलावात आल्याचा आरोप केला जात आहे. प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाने मात्र मगरीशी आमचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. प्राणीसंग्रहालयाचे मालक युवराज मोघे यांनी फेटाळून लावले. आमच्याकडे आवश्यक त्या सर्व परवानग्या असल्याचे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news