Mumbai News : नवजात बालकांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश | पुढारी

Mumbai News : नवजात बालकांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  अनधिकृत नर्सिंग होमच्या माध्यमातून चालणाऱ्या बालकांच्या विक्रीचे रॅकेट ट्रॉम्बे पोलिसांनी उघड केले आहे. पोलिसांनी बोगस डॉक्टरसह दलाल अशा एकूण पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

नवजात बालकांच्या जन्माबाबत किंवा दत्तक विधानाबाबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे न देता, खासगी व्यक्तीकडून पाच लाख रुपये घेऊन बाळांची विक्री केली जाणार असल्याची माहिती ट्रॉम्बे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोन महिलांना नवजात बालकासह ताब्यात घेतले.

पोलिसांनी चौकशीअंती गुन्हा दाखल करुन दलाल महिला गोरीबी शेख, शबाना शेख, गुलाबशा शेख, ज्युलीया फर्नांडीस, सायराबानो शेख आणि रिना चव्हाण यांना अटक केली आहे. यामध्ये बोगस डॉ. सायराबानो शेख आणि ज्युनिया फर्नांडीस ही सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात सहा गुन्हे दाखल आहेत

Back to top button