सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यात शहरी आणि ग्रामीण मिळून 72 हजारापेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

गिरगाव चौपाटी येथे एक तारीख एक तास या राज्यस्तरीय स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करताना सागराच्या साक्षीने सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात आल्याचे उद्गार यावेळी त्यांनी काढले. सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत बनविण्यासाठी आपण टाकलेले हे मोठे पाऊल असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज स्वच्छतेची ही लोकचळवळ झाली आहे, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

उत्साही नागरिक, विद्यार्थी यांच्या जोडीने, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांनी हातात झाडू घेऊन श्रमदान केले. 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर नागरिकांच्या श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. नगरविकास विभागाच्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

संबंधित बातम्या

गिरगाव चौपाटी येथे शुभारंभासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल, ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, इस्रायलचे कौन्सिल जनरल श्री कोबी, कोस्टगार्ड महासंचालक कैलाश नेगी, अभिनेते नील नितीन मुकेश, पद्मिनी कोल्हापुरे, जुही चावला, सुबोध भावे आदींची उपस्थिती होती.

Back to top button