Mumbai News : मराठी महिलेच्या गाळ्यावर गुजराती विकासकाचा कब्जा | पुढारी

Mumbai News : मराठी महिलेच्या गाळ्यावर गुजराती विकासकाचा कब्जा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुलुंडपाठोपाठ आता कांदिवलीतही मराठी महिलेवर गुजराती व्यक्तीकडून अन्याय झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कांदिवली येथील एका ज्येष्ठ मराठी महिलेने आपला गाळा निलेश परमार नावाच्या एका गुजराती विकासकाने बळकावल्याचा आरोप केला आहे. या निमित्ताने मुंबईत पुन्हा एकदा गुजराती -मराठी संघर्ष समोर आला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी रात्री उशीरा विकासक परमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

कांदिवली येथे वास्तव्याला असलेल्या रिटा दादरकर यांचा पारेख नगर याठिकाणी एक गाळा आहे. त्याच गाळ्यावर परमार यांनी आपला कब्जा केला आहे. यासाठी १० ते १५ जणांच्या जमावाने गाळ्यात घुसून सामानाची नासधूस करून गाळ्यावर ताबा घेतल्याचा आरोप दादरकर यांनी केला आहे

मनसेच्या इशाऱ्यानंतर गुन्हा दाखल

विकासक परमार यांच्याकडून गेल्या काही वर्षांपासून रिटा दादरकर यांच्यावर अन्याय केला जात होता. परंतु, कांदिवली पोलिसांकडून कुठलीही कारवाई केली जा नव्हती. यामुळे मनसेच्या चारकोप विधाससभा अध्यक्ष दिनेश साळवी यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चाचा इशारा दिल्यानंतर शनिवारी रात्री उशीरा पोलिसांनी परमार यांच्यासह अज्ञात १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल केला.

Back to top button