महाराष्ट्राला धोका! राजधानी सुरक्षित ठेवणे आवश्यक; मनसेच्या सोशल मीडिया पोस्टनंतर चर्चा

महाराष्ट्राला धोका! राजधानी सुरक्षित ठेवणे आवश्यक; मनसेच्या सोशल मीडिया पोस्टनंतर चर्चा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजधानी हातातून गेली तर राज्य गेलं, अशा शब्दात मनसेने मुंबईतील चर्चेचा विषय असलेल्या गुजराती लोकांच्या मुजोरीपणावर प्रतिक्रिया दिली आहे. गेले काही दिवस मुंबईत महाराष्ट्रीयन लोकांना घर देण्यास नकार दिल्याने संतप्त प्रतिक्रिया पहायला मिळाल्या. त्यानंतर मनसेने आज एक्स पोस्ट करत महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक प्रश्नांबाबत चिंता व्यक्त केली.

मनसेच्या एक्स पोस्टमुळे राजधानीच्या स्थानाबद्दल राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मुंबईच्या मुलुंड येथील एका गुजराती व्यक्तीने महाराष्ट्रीयन लोकांना घरे देण्यास नकार दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता. व्हायरल व्हिडिओनंतर मनसेने आक्रमक पाऊल उचल्याचे चित्र पहायला मिळाले. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रीयन लोकांनाच सन्मान न दिल्याने मनसेने संबंधित गुजराती व्यक्तीला धारेवर धरले. या प्रकरणानंतर आज पुन्हा 'मनसे अधिकृत' एक्स या सोशल मीडियावर महाराष्ट्राची राजधानी मुंबईबाबत चिंता व्यक्त करत असल्याची प्रतिक्रिया दिली.

मनसेच्या या एक्स सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहीले आहे की, राजधानी हातातून गेली कि राज्य गेलं… आज महाराष्ट्राची राजधानी मराठी माणसांना जेरीस आणून हातातून हिसकावून घेतली जात आहे पण तरीही आम्ही एकसंध मराठी समाज म्हणून लढायला तयार नाही. आम्ही जातीय विद्वेषात गुरफटलो आहोत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news