गणपतीतील कोकणवारीवर कुणाचे स्वामित्व नाही: हायकोर्ट | पुढारी

गणपतीतील कोकणवारीवर कुणाचे स्वामित्व नाही: हायकोर्ट

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून कोकणात जाण्याच्या परंपरेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. लाखो चाकरमान्यांचे कोकणात जाणे ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. आपल्या पूर्वजांच्या मूळ गावी जाणे ही सर्वसाधारण बाब आहे. असे स्पष्ट करताना न्यायमूर्ती आहे. मनीष पितळे यांनी चित्रपट वा वेबसिरीजमध्ये वापर करण्याच्या अनुषंगाने या परंपरेवर कुणी एक व्यक्ती कॉपीराईट अर्थात स्वामित्व हक्क सांगू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिल्याने देवाक काळजी वेबसिरीजच्या
प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

नॅव्हिन स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कॉपीराइटचे उल्लंघन झाल्याचा आरोप करीत देवाक काळजी नावाच्या वेब सिरीजचे प्रदर्शन रोखा, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली याचिकाकर्त्या कंपनीने देवाक काळजीच्या निर्मात्यांनी स्क्रिप्टची कॉपी केल्याचा आरोप करताना गणेशोत्सवादरम्यान कोकणी कुटुंबे त्यांच्या कोकणातील वडिलोपार्जित गावाकडे जातात, यावर अप्रत्यक्ष हक्क सांगितला. याचिकाकर्त्या कंपनीने चाकरमान्यांच्या या हालचालींशी संबंधित स्क्रिप्टवर कॉपीराईटचा दावा केला. न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला.

गणेशोत्सव हा कोकणातील माणसांचा जिव्हाळ्याचा आहे. कोकणी कुटुंबे त्यांच्या कोकणातील वडिलोपार्जित गावाकडे जातात. याचिकाकर्त्या कंपनीने चाकरमान्यांच्या या हालचालींशी संबंधित स्क्रिप्टवर केलेला कॉपीराईटचा दावा मान्य करताना येणार नाही. वास्तविक अशा सामान्य थीममध्ये किंवा मध्यवर्ती कल्पनेमध्ये कुणीही कॉपीराइटचा दावा करु शकत नाही. महाराष्ट्र राज्यात गणपती उत्सवादरम्यान कुटुंबातील सदस्य त्यांच्या वडिलोपार्जित स्थळांना भेट देतात. विशेषत: मुंबईत स्थायिक असलेला कोकणी कुटुंबे मोठ्या प्रमाणावर कोकणातील मूळ घर गाठतात, असे स्पष्ट मत व्यक्त करताना याचिकाकत्याने केलेले आरोप न्यायालयाने नोंदवले. हे आरोप सिद्ध करण्यास प्रथमदर्शनी भक्कम पुरावाच नाही, असे स्पष्ट करताना ही वेब सिरीज यूट्युबवर प्रदर्शित करण्यास विरोध करणारा नॅव्हिन स्टुडिओजचा अंतरिम अर्ज फेटाळला आणि याचिकेची सुनावणी २५ ऑक्टोबरपर्यंत तहकूब ठेवली…

Back to top button