मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला 24 तासांत ब्रेक | पुढारी

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला 24 तासांत ब्रेक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्य मंत्रिमंडळाच्या मराठवाड्यातील बैठकीत राज्य सरकारने विविध घोषणा केल्या. यात राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचीही घोषणा करण्यात आली. त्यानुसार अभियानाच्या अंमलबजावणीचा विस्तृत शासन निर्णय (जीआर) महिला व बाल विकास विभागाने जारी केला. मात्र अवघ्या 24 तासांत हा जीआरच स्थगित करण्याची नामुष्की विभागावर ओढवली आहे.

अंमलबजावणीत निर्माण झालेल्या अडचणीत दूर करून दोन दिवसांत नवा जीआर जारी करण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येत आहे.

Back to top button