‘लिज्जत पापड’च्या सहसंस्थापिका जसवंतीबेन पोपट यांचे निधन

मुंबई : ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’च्या सहसंस्थापिका जसवंतीबेन जमनादास पोपट (वय 93) यांचे सोमवारी रात्री 11 च्या सुमारास राहत्या घरी निधन झाल्याची माहिती त्यांच्या सूनबाई कनुबेन पोपट यांनी दिली.
गिरगावातील जगन्नाथ शंकर शेट रस्त्याजवळच्या शंकर बारी लेन येथील हलिया लोहाणा निवास या इमारतीच्या 2 दुसर्या मजल्यावर त्यांचे वास्तव्य होते. 21 तारखेला दादी शेठ आग्यारी लेन भाटिया ट्रस्ट सभागृहात प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, जसवंतीबेन यांच्यावर शाही इतमामात अंत्यसंस्कार न झाल्यामुळे अनेकांनी सरकारच्या उदासीनतेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.