Mumbai Crime : मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर चालत्या टॅक्सीत बलात्कार

Mumbai Crime : मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर चालत्या टॅक्सीत बलात्कार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : माणुसकीला लाजवेल अशी घटना महाराष्ट्राची राजधानी मुंबईतून समोर आली आहे. विशेष दिव्यांग अल्पवयीन मुलीवर चालत्या टॅक्सीत बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेने मुंबई हादरली आहे.(Mumbai Crime) या प्रकरणात मलबार हिल पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आरोपींमध्ये टॅक्सी चालकाचा आणि त्याच्या मित्राचा समावेश आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की,  ही घटना सोमवारी (दि.१८) रात्रीच्या सुमारास घडली.

Mumbai Crime : आधी अपहरण मग बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरोपी टॅक्सी ड्रायव्हरने मुलीला रस्त्यात पाहिले आणि तिला त्यात बसण्यास सांगितले. त्यानंतर तो टॅक्सी चालवून एका हॉटेलमध्ये त्याच्या मित्राला भेटला. त्यानंतर टॅक्सी चालकाचा मित्र मुलीसोबत मागील सीटवर बसला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दोन्ही आरोपींनी मुलीला वाकोला येथे नेले आणि त्यानंतर तिच्यासाठी ऑटो भाड्याने घेतला. त्यांनी ऑटोचालकाला पैसे दिले आणि तिला मालवणी येथील नातेवाइकांच्या घरी सोडण्यास सांगितले. पुढे पोलिसांनी असेही सांगितले की, "मुलीने मालवणीतील तिच्या नातेवाईकांना ही घटना सांगितली आणि त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन एफआयआर नोंदवला,"

दोघांना अटक

पोलिसांच्या पथकांनी ही घटना समोर येताच आरोपींचा शोध सुरू केला, सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. आणि टॅक्सीचा नोंदणी क्रमांक मिळवला. पोलिसांनी टॅक्सी चालक आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले. त्यांच्यावर सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने त्यांनी पोक्सो कायद्याची कलमेही लावली आहेत. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून, आरोपींचा काही गुन्हेगारी इतिहास आहे का याचा तपास केला जात आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news