‘…आयुष्याचा खेळ; होय पेटवतोय मी महाराष्ट्र’ : रोहित पवारांची पोस्ट चर्चेत

‘…आयुष्याचा खेळ; होय पेटवतोय मी महाराष्ट्र’ : रोहित पवारांची पोस्ट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहित पवार कंत्राटी नोकर भरती, पेपरफुटी, तलाठी परीक्षा, बेरोजगारी आदी प्रश्नांकडे सरकराचे लक्ष वेधत आहेत. दरम्यान, त्यांचा एक कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कॉल रेकॉर्डवरुन त्यांना  ट्रोल केलं जात आहे. यासंदर्भाने त्यांनी आपल्या 'X' खात्यावर एक पोस्ट करत म्हटल आहे की, "सत्तेच्या मस्तीत बेधुंद असलेल्या सरकारला जाब विचारून विद्यार्थ्यांची भूमिका मांडणं म्हणजे महाराष्ट्र पेटवणं असेल तर  होय पेटवतोय मी महाराष्ट्र!" (Maharashtra Politics)

संबधित बातम्या

Maharashtra Politics : कॉल रेकॉर्ड व्हायरलं…

महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पक्षांतर, आरोप-प्रत्यारोप, ट्रोलींग अशी काहीशी पाहायला मिळेल. सोशल मीडियावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहीत पवार यांचा एक कॉल रेकॉर्ड सोशल मीडियावर व्हायरलं होत आहे. त्यामधील संवाद पुढीलप्रमाणे…

या कॉल रेकॉर्डवरुन रोहित पवार यांना संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत.

होय पेटवतोय मी महाराष्ट्र….

व्हायरल  कॉल रेकॉर्ड वरुन येणाऱ्या संमिश्र प्रतिक्रियावर रोहित पवार यांनी आपल्या 'X' खात्यावर एक पोस्ट केली आहे. त्‍यांनी म्हटलं आहे की,"विद्यार्थ्यांनी सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही सरकार झोपेचं सोंग घेत आहे. या सरकारपर्यंत विद्यार्थ्यांचा आवाज पोहचणार नसेल तर या सरकारला झोपेतून जागं करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर तर उतरावंच लागेल!!"

राेहित पवारांनी केलेली पोस्ट वाचा त्यांच्याच शब्दात…

"भाजपची ट्रोल गँग माझ्याविरोधात कालपासून अचानक सक्रीय होऊन मला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. या ट्रोल गँगचा विषय काय तर रोहित पवार राज्यातल्या युवकांना पेटवत आहे. एक महिन्यापूर्वीची फोन क्लिप व्हायरल केली जातेय, ज्यात मी म्हणत आहे की, "परीक्षा फीच्या विषयात सरकार काही ऐकत नाही त्यामुळे हा विषय थोडा पेटवत ठेवावा लागेल त्याशिवाय हा विषय सुटणार नाही. काही लोकांना आंदोलन करायला सांगितले आहे. त्याशिवाय हे सरकार सुधारणार नाही".

सरकारने गंभीरपणे सांगावं यात काही चुकीचं आहे? सरकारने परीक्षा फीच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांची लुटमार करायची, पेपरफुटी होत असताना दुर्लक्ष करायचं, कंत्राटीकरणाला बळ द्यायचं, युवा वर्गाच्या आयुष्याचा खेळ मांडायचा. आता या विषयांवर सत्तेच्या मस्तीत बेधुंद असलेल्या सरकारला जाब विचारून विद्यार्थ्यांची भूमिका मांडणं म्हणजे महाराष्ट्र पेटवणं असेल तर  होय पेटवतोय मी महाराष्ट्र! आणि तुम्हाला महाराष्ट्र पेटू द्यायचा नसेल तर पेपरफुटी संदर्भात कायदा करा, गोरगरीब विद्यार्थ्यांकडून लुटलेली परीक्षा फी परत करा, कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करा. विद्यार्थ्यांनी सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही सरकार झोपेचं सोंग घेत असेल, या सरकारपर्यंत विद्यार्थ्यांचा आवाज पोहचणार नसेल तर या सरकारला झोपेतून जागं करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर तर उतरावंच लागेल!!"

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news