मुंबई : डेटिंग अॅपवरील ओळखीतून तरुणीने गंडवले; ८५ लाखांची फसवणूक

मुंबई : डेटिंग अॅपवरील ओळखीतून तरुणीने गंडवले; ८५ लाखांची फसवणूक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  कि स्टोकरन्सीमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची बतावणी करुन एका ३९ वर्षांच्या व्यक्तीची अज्ञात सायबर ठग तरुणीने सुमारे ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार विलेपार्ले परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिंग्यू हुआंग ऊर्फ हेलन नाव सांगणाऱ्या अज्ञात तरुणीविरुद्ध सायबर सेल पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

विलेपार्ले येथील जुहू स्किम परिसरातील एका पॉश अपार्टमेंटमध्ये तक्रारदार त्याच्या वयोवृद्ध आई- वडिलांसोबत राहतात. अविवाहीत असलेल्या तक्रारदार यांनी मोबाईलवर एक डेटिंग अॅप डाऊनलोड केले होते. तिथेच त्यांची जिंग्यू या तरुणीशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. इंटाग्रामवर चॅट करताना तिने त्यांना ती मूळची चीन देशाची नागरिक असून तिचे आई-वडिल वांद्रे येथील बीकेसी परिसरात राहतात. ती सध्या सिंगापूर येथे वास्तव्यास असून तिथे तिचा चायनीज फुडचा व्यवसाय आहे. लवकरच ती तिचा सिंगापूरचा व्यवसाय बंद करुन मुंबईत स्थायिक होणार असल्याचे सांगत विश्वास संपादन क्रिस्टोमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

बोगस वेबसाईटची माहिती

देऊन पैशांचा अपहार दरम्यान, तक्रारदार यांनी स्वतःच्या बँक खात्याची माहिती काढली असता, त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम संबंधित वेबसाईटवर न जाता जिंग्यूच्या वैयक्तिक खात्यात जमा झाली होती. तिनेच बोगस वेबसाईट पाठवून त्यांना किस्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news