वंचित बहुजन आघाडीला ‘इंडिया’तून का वगळले? राेहित पवारांना सुजात आंबेडकरांचा सवाल | पुढारी

वंचित बहुजन आघाडीला 'इंडिया'तून का वगळले? राेहित पवारांना सुजात आंबेडकरांचा सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : वंचित बहुजन आघाडीने इंडिया आघाडीविरोधात उमेदवार देऊ नये, असे विधान राष्‍ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आमदार रोहित पवार यांनी केले हाेते. त्‍यांच्‍या या विधानानंतर आता राज्यात वंचित बहुजन आघाडी विरुद्ध इंडिया आघाडी, असे चित्र निर्माण झाले आहे. आज (दि.१६) वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी साेशल मीडियावर एक्सवर पोस्ट करत वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सामील का करुन घेतलं नाही, असा सवाल केला आहे.

जे आधीच मागे आहेत त्यांनी आणखी किती पाऊले मागे जायचं?

आमदार रोहित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीने इंडिया आघाडीविरोधात उमेदवार देऊ नये असे विधान केलेले होते. या विधानावर सुजात आंबोडकर यांनी आपल्‍या पाेस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, भलेही इंडिया आघाडीच्या निर्णय प्रक्रियेत तुम्ही सहभागी नसाल पण, इंडिया आघाडीच्या महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेण्याबद्दल एक वाक्यता का नाही? वंचित बहुजन आघाडीने INDIA विरोधात उमेदवार उभा करू नये, ही भूमिका घेताना INDIA आघाडीच्या नेत्यांनी स्वतः वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देऊन मतांची फूट टाळण्याचा प्रयत्न का करू नये? ‘फोडा आणि राज्य करा’ ही भाजपची निती स्पष्ट असताना वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीतून दूर ठेवून फूट का पाडली जात आहे? सर्वांनी दोन पाऊल मागे घेण्याची गरज असेल, तर जे आधीच मागे आहेत त्यांनी आणखी किती पाऊले मागे जायचं? असा सवालही सुजात आंबेडकर यांनी केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button