जुनी डबलडेकर १५ ला घेणार निरोप | पुढारी

जुनी डबलडेकर १५ ला घेणार निरोप

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : बसथांब्यावरील गर्दीमधून वाट काढत डबलडेकर बसच्या दुसर्या मजल्यावर धावत जायचे. खिडकीसमोरची सीट पकडायची आणि खिडकीतून येणारी थंड हवा अंगावर घेत मुंबई पाहण्याची मज्जा काही औरच. पण येत्या १५ सप्टेंबरपासून मुंबईकरांना हे सुख मिळणार नाही. कारण तब्बल ८६ वर्ष मुंबईकरांची सेवा करुन बेस्टच्या ताफ्यातील जुन्या डबलडेकर बस सेवेतून हद्दपार होत आहेत. त्यानंतर मुंबईच्या रस्त्यावर फक्त एसी डबलडेकर बस प्रवाशांच्या सेवेत राहतील.

मुंबईकरांची सेकण्ड लाईफलाईन असलेल्या बेस्टची मुंबईत पहिली वाहतूक १५ जुलै १९२६ मध्ये सुरू झाली. त्यापूर्वी मुंबईत ट्राम धावत होती. कालांतराने बदल होत सिंगल डेकरच्या जोडीला डबल डेकर बसही सेवेत आल्या. बेस्टची पहिली डबल डेकर बस ८ डिसेंबर १९३७ मध्ये सुरु झाली. सुरुवाती पासूनच प्रवाशांची डबलडेकरला चांगली पसंती मिळाली. सिंगल डेकर बसच्या तुलनेत डबलडेकर बसची प्रवासी क्षमता जास्त असल्याने बेस्ट प्रशासनाने देखील डबल डेकर बसवर भर दिला.

साधारणपणे १६ वर्षापुर्वी बेस्टच्या ताफ्यात ९०१ डबलडेकर बस होत्या. परंतु बसचे पंधरा वर्षाचे आयुर्मान आणि वांरवार उद्धभवणारे बिघाड तांत्रिक समस्या यामुळे डबलडेकरचा ताफा कमी होऊ लागला. डिसेंबर २०१९ मध्ये बेस्टकडे फक्त १२० डबलडेकर होत्या. २०२२-२३ मध्ये ४५ डबलडेकर बस शिल्लक राहिल्या होत्या. येत्या सप्टेंबरपर्यंत ताफ्यात उरलेल्या चार बस कालबाह्य होणार आहे

Back to top button