लग्नाच्या आमिषाने अभिनेत्रीला गंडवले; एकास अटक | पुढारी

लग्नाच्या आमिषाने अभिनेत्रीला गंडवले; एकास अटक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  लग्नाच्या आमिषाने तरुण अभिनेत्री फसवणूक करुन पळालेल्या हार्दिक प्रफुल्लचंद्र त्रिवेदी या ठगाला वर्सोवा पोलिसांनी अटक केली. ओळखीनंतर एकाच महिन्यात १७.५ लाखांचा अपहार करुन फसवणूक केल्याचा हार्दिकवर आरोप असून त्याने असे काही गुन्हे केले का याचा तपास सुरु आहे.

३५ वर्षांची तक्रारदार तरुणी ही अॅक्टर अंधेरीत आई- वडिलांसोबत राहते. लग्नासाठी तिने खासगी संकेतस्थळावर नोंदणी केली. एप्रिल २०२३ मध्ये हार्दिकने तिच्या प्रोफाईलला लाईक केल्यावर तिच्या वडिलांनी त्याला फोन करुन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने टुरिझमचा व्यवसाय असल्याचे व मुलीशी विवाहाची इच्छा व्यक्त केली. नंतर तो मुलीला भेटत राहिला. याच भेटीत त्याने प्रोडक्शन हाऊस सुरु करणार आहे. त्यासाठी त्याने मुलीकडून ५० हजार रुपये घेतले. यानंतरही तो तिच्याकडून पैसे घेत राहिला. अशा प्रकारे हार्दिकने तिच्याकडून भावाच्या औषधोपचार, प्रोडेक्शन हाऊस, हॉटेल बुकींग व स्वतच्या व्यवसायासाठी १४ एप्रिल ते २२ मे २०२३ दरम्यान १७ लाख ५८ हजार रुपये घेतले. मात्र, नंतर तो टाळू लागल्याने तिने पोलिसांत तक्रार नोंदवली.

Back to top button