जालना : राज ठाकरेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे जालन्यातील अंतरवाली सराटी या आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली. त्याच्यासोबत अमित ठाकरे देखील उपस्थित आहेत. दरम्यान जालन्यात जाण्यापूर्वी राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मराठा आरक्षण आंदोलकांची भेट घेतली.