छत्रपती संभाजीनगर: पाचोड पोलीस ठाण्यासमोर सोनवाडी ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन | पुढारी

छत्रपती संभाजीनगर: पाचोड पोलीस ठाण्यासमोर सोनवाडी ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

पैठण, पुढारी वृत्तसेवा : सोनवाडी गावात ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून गुरुवारी (दि.२४) दोन समाजात हाणामारीची घटना घडली होती. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात एका समाजाकडून गावातील चार जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी सोनवाडी ग्रामस्थांनी आजपासून (दि. २७) पाचवड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोनवाडी ग्रामपंचायत अंतर्गत गावामधील रस्त्याचे काम सुरू आहे. यावरून तक्रारदार महिला सविता चकणेस चव्हाण (रा. सोनवाडी बु.) यांनी गावातील शिवाजी प्रभू नवले, शिवाजी दामू नवले, ज्ञानू एकनाथ अल्हाट, कैलास सर्जेराव गुंजाळ (सर्व रा. सोनवाडी बु, ता. पैठण) यांच्याविरुद्ध शनिवारी (दि.२६) ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणाचा तपास पैठण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे करीत होते. दरम्यान, आज सकाळी सोनवाडी येथील शंभरहून अधिक ग्रामस्थांनी पाचोड पोलीस ठाण्यात येऊन ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.

हेही वाचा 

Back to top button