Hari Narke Passes away | ज्येष्ठ विचारवंत, लेखक हरी नरके यांचे हृदयविकारानं निधन | पुढारी

Hari Narke Passes away | ज्येष्ठ विचारवंत, लेखक हरी नरके यांचे हृदयविकारानं निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ विचारवंत, लेखक डाॅ. हरी नरके यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन झाले आहे. मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७० वर्षांचे होते.  ते समता परिषदेचे उपाध्यक्ष होते. (Hari Narke Passes away) थोड्याच वेळात छगन भुजबळ एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत.

डाॅ. हरी नरके यांच्यावर  मुंबईतील एशिअन हार्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. मागील वर्षभरापासून हरी नरके आजारी होते.  उपचारासाठी त्यांना लिलावती रुग्णालयात १५-२० दिवस दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एक-दोन महिन्यापूर्वी राजकोट येथील रुग्णालयात गेले होते. तिथे त्यांची प्रकृती स्थिर झाली होती. आज (दि.९) ते मुंबईला येत असताना प्रवासात सहा वाजताच गाडीत त्यांना दोन उलट्या झाल्या.

डाॅ. हरी नरके यांनी  पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे अध्यासन प्राध्यापक म्हणून काम पाहिलं आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केलं आहे. त्याचबरोबर पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवरही त्यांचं उल्लेखनीय काम होतं. प्रा. हरी नरके यांनी विपुल लेखन केले आहे. महाराष्ट्र  शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला,  त्याचे संपादन, डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने २६ खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन  हरी नरके यांनी केले आहे.  महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.  मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे.

हेही वाचा 

Back to top button