Maharashtra Politics : जयंत पाटील, प्राजक्त तनपुरे, राजेश टोपे, मानसिंग नाईक लवकरच अजित पवार यांच्या गटात | पुढारी

Maharashtra Politics : जयंत पाटील, प्राजक्त तनपुरे, राजेश टोपे, मानसिंग नाईक लवकरच अजित पवार यांच्या गटात

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics)  लवकरच मोठ्या घडामोडी होणार असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा दुसरा हादरा बसणार आहे. या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह त्यांचे भाचे आमदार प्राजक्त  तनपुरे, राजेश टोपे आणि मानसिंग नाईक हे अजित पवार गटात लवकरच प्रवेश करणार असल्याचे समजते.

शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटासोबत घेण्यास तत्कालीन भाजपा नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांच्या नावावर फुली मारली होती. आता तोच प्रकार कळवा – मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबाबतीत घडल्याची चर्चा आहे. फडणवीस यांनीच आव्हाड यांच्या प्रवेशाला विरोध केल्यामुळे जयंत पाटील यांच्यासोबतच्या ‘लॉट’मध्ये त्यांचा समावेश झाला नाही. (Maharashtra Politics)

जयंत पाटील यांच्यासोबत शिराळा मतदारसंघाचे आमदार मानसिंग नाईक व सुनील भुसारा हेही अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या चार आमदारांचा प्रवेश झाल्यानंतर आव्हाड यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि रोहीत पवार हे तीन आमदार मुळ राष्ट्रवादीमध्ये राहतील, असे बोलले जाते. पक्षातील सर्वच नेत्यांनी सिम्मोलंघन केल्यामुळे रोहीत पवारसुद्धा शरद पवार यांची साथ सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत अजित पवार गटाची सॉफ्ट भूमिका आहे.

हेही वाचा 

Back to top button