वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार 25 लाखांचे अर्थसहाय्य | पुढारी

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार 25 लाखांचे अर्थसहाय्य

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणारे मृत्यू, अपंगत्व, गंभीर जखमी आणि किरकोळ जखमी झाल्यास द्यायच्या अर्थसहाय्यात वाढ करण्यात आली आहे. व्यक्ती मृत्यू पावल्यास त्याच्या वारसांना 25 लाख रुपये, गंभीर अपंगत्व आल्यास 7 लाख 50 हजार रुपये, गंभीररीत्या जखमी झाल्यास पाच लाख रुपये आणि किरकोळ जखमी झाल्यास त्याला औषधोपचारासाठी खर्च देण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

सध्याच्या आर्थिक तरतुदीत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व, गंभीर जखमी आणि किरकोळ जखमी व्यक्तीला द्यावयाची आर्थिक मदत कमी असल्याबाबत तसेच त्यामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. लोकप्रतिनिधींकडून आर्थिक सहाय्यामध्ये वाढ करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Back to top button