"त्यांची चिठ्ठी नेमकी कुठे अडते..." : फडणवीसांची विधानसभेत जोरदार 'टोलेबाजी' | पुढारी

"त्यांची चिठ्ठी नेमकी कुठे अडते..." : फडणवीसांची विधानसभेत जोरदार 'टोलेबाजी'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांची विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी निवड होणार असे आम्‍ही ऐकत होतो. याबाबतची त्‍यांची चिठ्ठी झाली आहे. त्‍यावर सही झाली आहे. ती चिठ्ठी दिल्‍लीवरुन निघालीय, असेही आम्‍ही ऐकलं. मात्र त्‍यांची चिठ्ठी नेमकी कुठे अडते हे माहिती नाही, अशा शब्‍दांमध्‍ये उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.३) विधानसभेत चौफेर टोलेबाजी केली. निमित्त होतं विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्‍याचं.

ज्‍याला कुठेच न्‍याय मिळत नाही त्‍याला आम्‍हाला न्‍याय द्यावा लागतो

२०१९ मध्‍ये विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसने निवड केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकार स्‍थापन दिल्‍यवर त्‍यांना त्‍यांच्‍या उंचीचे खाते मिळाले नाही. ही सल त्‍यांच्‍या मनात राहिल. मागे ज्‍यांच्‍यावर अन्‍याय झाला त्‍यांना आम्‍ही न्‍याय दिला. ते आज आमच्‍यासाेबत साेबत आहेत. शेवटी ज्‍याला कुठेच न्‍याय मिळत नाही त्‍याला आम्‍हाला न्‍याय द्यावा लागतो, असाही टाेला यावेळी फडणवीसांनी लगावला.

यावेळी फडणवीस म्‍हणाले की, २०१९ मध्‍ये विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसने निवड केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकार स्‍थापन दिल्‍यवर त्‍यांना त्‍यांच्‍या उंचीचे खाते मिळाले नाही. ही सल त्‍यांच्‍या मनात राहिल. मागील २५ वर्षांपेक्षा अधिक काळ त्‍यांनी राज्‍याचे राजकारण जवळून पाहिले आहे. त्‍यांनी विदर्भात शिवसेना वाढविण्‍यास विशेष परीश्रम घेतले. आता वडेट्टीवार यांच्या अनुभवाचा सभागृहास फायदा होणार असल्याचेही त्‍यांनी सांगितले.

राज्याला सक्षम विरोधी पक्षनेता मिळाला

विजय वडेट्टीवार यांच्‍या रुपाने एक सक्षम विरोधी पक्ष नेता मिळाला आहे.  सरकारच्‍या चुका दाखवून देण्‍याचे काम विरोधी पक्ष नेतेपदाचे असते. आता विरोधी पक्ष नेतेपदासारख्‍या महत्त्‍वाच्‍या पदाची जबाबदारी त्‍यांच्‍याकडे आली आहे. ते या पदाचा मान ते वाढवतील, असा विश्‍वासही फडणवीस यांनी व्‍यक्‍त केला.

उशीर झाला;पण वडेट्टीवार ही कसर भरून काढतील : मुख्‍यमंत्री शिंदे

यावेळी वडेट्टीवारांचे अभिनंदन करताना मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणाले की, विधानसभेच्‍या पावसाळी अधिवेशनाच्‍या सुरुवात झाली तेव्‍हाच वडेट्टीवारांनी विरोधी पक्ष नेतेपदाच्‍या जागेवर बसायला हवे होते. आम्‍हाला तर विना विरोधी पक्ष नेताच अधिवेशन पार पडेल, असे वाटत होते. असो थोडा उशीर झाला पण आता वडेट्टीवार ही कसर भरून काढतील, अशी मिश्‍कील टिपण्‍णीही शिंदे यांनी केली.

विरोधी पक्ष नेतेपदाचरच राहण्‍यासाठी शुभेच्‍छा : उपमुख्यमंत्री अजित पवार

विरोधी पक्ष नेतेपद हे जबाबदारीचे पद आहे. राज्‍याच्‍या मुख्‍यमंत्री पदाकडून जनतेचा अपेक्षा असतात. ती जबाबदारी पूर्ण करण्‍याची जबाबदारी विरोधी पक्ष नेत्‍याची असते. राज्‍याला विरोधी पक्ष नेतेपदाची उज्‍ज्‍वल परंपरा आहे. विरोधी पक्षनेतेपद सन्‍मानाचं आहे, अशा शुभेच्‍छा देत आता एक वर्षात विधानसभा निवडणूक होणार आहेत. आता यापुढेही तुम्‍ही वर्षानूवर्ष याच पदावर बसाल, असा चिमटाही यावेळी अजित पवारांनी काढला.

त्‍यावेळी काय चर्चा झाली हे केवळ आम्‍हा दोघांनाच माहिती

यावेळी अजित पवार म्‍हणाले, विजय वडेट्टीवारांनी यांनी चंद्रपूर सारख्‍या ठिकाणी शिवसेना वाढविण्‍याचे काम केले. २५ वर्षांची कारकीर्दीत त्‍यांनी अनेक जबाबदारीच्‍या पदावर काम केलेले आहे. त्‍यांचा विदर्भात लोकसंपर्क उत्तम आहे. त्‍यांनी यापूर्वीही विरोधी पक्ष नेता म्‍हणून काम केले होते यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्‍ये चांगले खाते मिळायला पाहिजे होते, यावेळी आपल्‍या दोघांमध्‍ये काय चर्चा झाली. याची आपल्‍या दोघांना कल्‍पना आहे. मात्र विरोधी पक्ष नेते म्‍हटलं की, विजय वडेट्टीवार यांचे नाव समोर येते ;पण चांगले दिवस आले की चांगले खात्‍याचा तुमच्‍या नावाचा विचार होत नाही, असा टोलाही अजित पवारांनी लगावला.

आपण महाराष्‍ट्राच्‍या राजकारणातील लढावू नेते आहात. कधीकाळी आपण मंत्रीमंडळाचे सहकारी होता. विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी घेण्‍याचे धाडस दाखवले आहे. आता एक वर्षात विधानसभा निवडणूक होणार आहेत. आता यापुढेही तुम्‍ही वर्षानूवर्ष याच पदावर बसावे, अशा शुभेच्‍छावजा टाेलाही त्‍यांनी लगावला.

 

Back to top button