Aryan Khan चे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले, तो नशीबवान पण… | पुढारी

Aryan Khan चे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले, तो नशीबवान पण...

मुंबई, पुढारी ऑनलाईन

आर्यन खान Aryan Khan नशीबवान आहे की, त्याच्या वडिलांकडे पैसा होता. त्याने देशातील महागडे वकील देऊन जामीन मिळविला, पण विनाकारण तुरुंगात खितपत पडणाऱ्यांचे हाल कुणीही खात नाही, अशी टीका आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केली. कनिष्ट न्यायालये त्यांच्या अधिकार क्षेत्राचा वापर करत नाहीत. त्यामुळे देशात हजारो लोक न्यायापासून वंचित आहेत, असेही ते म्हणाले.

सतीश मानेशिंदे हे बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला मुंबई उच्च न्यायालयात High Court जामीन मिळविण्यासाठी वकील म्हणून युक्तिवाद करत होते. मानेशिंदे यांनी यापूर्वी संजय दत्त, रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौक चक्रवर्ती यांसारख्या सेलिब्रिटीसाठी कोर्टात युक्तिवाद केले होते. आर्यन खानला तब्बल २५ दिवसांनंतर जामीन मंजूर झाला. त्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे त्याला एक दिवस तरुंगात रहावे लागले.

आर्यनला Aryan Khan जामीन झाल्यानंतर बार अँड बेंचमध्ये मानेशिंदे यांनी दिलेल्या मुलाखीत कनिष्ट न्यायालयांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवत टीका केली. ते म्हणाले, ‘ ज्यांना वकील देणे परवडत नाही, असे अनेक लोक तुरुंगात खितपत पडले आहेत. मला असे वाटते की दोन कनिष्ठ न्यायालये त्यांच्या अधिकार क्षेत्राचा वापर करण्यात अयशस्वी ठरले आहेत. त्यांच्या अनास्थेमुळे कायदेशीर व्यवस्थेवर भार पडत आहे. याशिवाय उच्च न्यायालयांत खटले लांबत आहेत. ज्या गोष्टीवर कनिष्ठ न्यायालयाने पहिल्याच दिवशी निकाल द्यायला हवा होता, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे हा त्रिस्तरीय लढा सुरू झाला.’

Aryan Khan मानेशिंदे : आर्यन खान नशीबवानच

आर्यन खानसाठी सतीश मानेशिंदे, अमित देसाई आणि मुकूल रोहतगी या तीन वकिलांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. या पार्श्वभूमीवर मानेशिंदे म्हणाले, ‘आर्यन खान भाग्यवान आहे की त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी देशातील सर्वोत्तम कायदेशीर टीम मिळवून दिली. या देशात असे हजारो लोक आहेत ज्यांना वकील परवडत नाहीत. अशिक्षित, गरीब आणि उपेक्षित आहेत त्यांना न्याय मिळत नाही. आपल्या देशाने आणि न्यायव्यवस्थेने अशा लोकांचा विचार करून ही व्यवस्था सुधारली पाहिजे. एखाद्या सिनेस्टारचा मुलगा २५ दिवस कुठल्याही पुराव्याविना त्रास सहन करत असेल तर गरीबाचे काय होईल, ही कल्पनाच न केलेली बरी.

हेही वाचा : 

Back to top button