Mumbai Crime : बांग्लादेशी तरुणीची वेश्या व्यवसायासाठी दीड लाखांत विक्री  | पुढारी

Mumbai Crime : बांग्लादेशी तरुणीची वेश्या व्यवसायासाठी दीड लाखांत विक्री 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा, Mumbai Crime : बांग्लादेशी तरुणीला नोकरीचे आमीष दाखवून मुंबईत आणून तिचा दीड लाख रुपयांत सौदा करत वेश्याव्यवसायात ढकलण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेने या तरुणीची सुटका करत तीन वेश्या दलालांना अटक केली आहे.

बांग्लादेशातील रहिवासी असलेल्या पीडित २५ वर्षीय तरुणीला एका दलालाने चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवत मुंबईत आणले. त्यानंतर त्याने या तरुणीचा दीड लाख रुपयांत सौदा केला. पुढे या तरुणीला व्ही. पी. रोड येथील, हाजी ईस्माईल इमारतीच्या तळ मजल्यावरील खोलीत डांबून बळजबरीने तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जाऊ लागला. Mumbai Crime

तरुणीने विरोध केल्यास तिला मारहाण करण्यात येत होती. मुंबईतील काहीच माहिती नसल्याने ती असहाय्य होती. अखेर तिने वेश्यागमनासाठी आलेल्या एका ग्राहकाकडे मदत मागितली. ग्राहकाने एका सामाजिक संस्थेला या तरुणीबाबत सांगितले. संस्थेकडून याबाबत माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या अंमलबजावणी कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या पथकाने छापेमारी करुन पीडित तरुणीसह एकूण सात जणींची सुटका केली.

याप्रकरणी डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपी वेश्या दलाल सुधीर कुमार शर्मा (४२), योधान यादव (३७) आणि मिथिलेश यादव (४७) यांना अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणीचा सौदा करणाऱ्या आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. Mumbai Crime

हे ही वाचा :

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाख; वनमंत्री मुनगंटीवार यांची माहिती

Koyna Dam : कोयनेतून आजपासून दुप्पट विसर्ग

Back to top button