Ajit Pawar Birthday : 'मी...मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की....!' मिटकरींच्या ट्विटची चर्चा | पुढारी

Ajit Pawar Birthday : 'मी...मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की....!' मिटकरींच्या ट्विटची चर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या ट्विटची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. हे ट्विट त्यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केले आहे. हे ट्विट करत त्यांनी अजित पवार यांचा ३१ सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. पाहूया काय आहे ट्विट. (Ajit Pawar Birthday)

Ajit Pawar Birthday : मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…

आज (दि.२२) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी शुक्रवारी (दि.२१) एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटची चर्चा राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर होऊ लागली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच” आणि अजितपर्व असा हॅशटॅग दिला आहे. या ट्विटसह त्यांनी ३१ सेकंदाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

आपल्याला जी गोष्ट पटते ती…

मिटकरी यांनी शेअर केलेल्या ३१ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये अजित पवार यांच्या विविध कार्यक्रमातील क्षण आहे. एका ठिकाणी अजित पवार “मी अजित अनंतराव पवार..” असं म्हंटलेला क्षण आहे त्यानंतर पुढील एका ठिकाणी अजित पवार म्हणत आहेत की, “आपल्याला जी गोष्ट पटते ती आपण लगेच तिथे येस म्हणतो, की, परंतु कोणी उठून सांगितलं माफी मागा. तर माफी बिफी मागायला तयार नाही.” त्यानंतर व्हिडिओमध्ये निडर नेतृत्व, करारी व्यक्तिमत्व, संघर्षयोद्धा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा लिहलं आहे. मिटकरी यांनी आज (दि.२२) एक ट्विट करत म्हंटलं आहे की,”महाराष्ट्र राज्याचे सुसंस्कृत उज्वल भविष्य उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजित दादा आपणास वाढदिवसाच्या अंत:करण पूर्वक शुभेच्छा. माझ्यासारख्या अनेक फाटक्या माणसांना ज्यांनी राजकीय प्रतिष्ठा व ओळख दिली अशा दादांना आमचेही आयुष्य लाभो ही जिजाऊ चरणी प्रार्थना”

हेही वाचा 

Back to top button