Monsoon Session : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अनेक आमदार अनुपस्थित

Monsoon Session : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अनेक आमदार अनुपस्थित

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गटांकडून आमदारांच्या पाठिंब्याचा दावा केला जात असतानाच पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) पहिल्याच दिवशी संभ्रम निर्माण झाला. शरद पवार व अजित पवार या दोन्ही गटांकडील अनेक आमदार सभागृहात अनुपस्थित असल्याने नेमके कोणाच्या बाजूने किती संख्याबळ आहे, हे समजू शकलेे नाही.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. राष्ट्रवादीतील फुटीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले होते. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या 9 मंत्र्यांना वगळून उर्वरित सर्व आमदारांची विरोधी बाकावर बसण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे केली होती.

अधिवेशनाचे कामकाज सुरू होताच पहिल्याच दिवशी अनेक आमदारांनी सभागृहात येणे टाळले. त्यामुळे कोणाच्या गटात किती आमदार होते, याबाबत पहिल्या दिवशी संभ्रम कायम राहिला. अजित पवार गटाचे असलेले नरहरी झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. विरोधी बाकावरील विरोधी पक्षनेत्याच्या बाजूला असलेल्या आसनावर ते बसले होते. (Monsoon Session)

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले असले, तरी त्यांच्यासाठी विरोधी आणि सत्ताधारी बाकावर अशी आसन व्यवस्था करण्यात आली नव्हती. विधिमंडळाच्या लेखी राष्ट्रवादी काँग्रेस हा एकच पक्ष असल्याने विरोधी पक्षांच्या ठिकाणीच त्यांची आसन व्यवस्था होती.

शरद पवार समर्थक उपस्थित आमदार

1) जयंत पाटील
2) अनिल देशमुख
3) बाळासाहेब पाटील
4) राजेश टोपे
5) प्राजक्त तनपुरे
6) सुमन पाटील
7) रोहित पवार
8) मानसिंग नाईक
9) सुनील भुसारा

अजित पवार गट नऊ मंत्र्यांशिवाय

1) बबन शिंदे
2) इंद्रनील नाईक
3) प्रकाश सोळंके
4) किरण लहमाटे
5) सुनील शेळके
6) सरोजिनी अहिरे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news