CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

माझ्या राजीनाम्याची अफवा पसरवण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री शिंदे

Published on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मी राजीनामा देणार, अशी अफवा जाणीवपूर्वक पसरविली जात आहे. अशा अफवा पसरविणार्‍यांनी आपल्या घरात काय जळतेय ते आधी पाहावे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे शिवसेनेला लागवला.

मी राजीनामा देणार, आमचे आमदार बाहेर पाडणार, अशा अफवा पसरविल्या जात आहेत. हे त्यांचे 'मुंगेरीलाल के हसीन सपने'च आहेत. आम्ही कामे करतोय. सरकार गतीने निर्णय घेत आहे, ही त्यांची पोटदुखी आहे, असे शिंदे म्हणाले. आम्ही सत्ता असतानाही ती सोडून दिली होती. आम्हाला पुढे काय होणार, हेदेखील माहीत नव्हते. आमदार सत्तेसाठी बाहेर पडतात; पण आम्ही सत्तेतून बाहेर पडलो होतो. आमचे सरकार चांगले चालले आहे. महायुतीत कोणतीही अडचण किंवा नाराजी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news