गेलेल्या आमदारांशी चर्चा सुरू, सर्व महाराष्ट्र शरद पवार यांच्या पाठीशी : जयंत पाटील | पुढारी

गेलेल्या आमदारांशी चर्चा सुरू, सर्व महाराष्ट्र शरद पवार यांच्या पाठीशी : जयंत पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार काम करत होते. आज (दि.२) सकाळी त्यांनी राजभवनात जाऊन त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या काही सदस्यांनी मंत्रीमंडळात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची याला कोणतीही मान्यता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकसंध पणाने शरद पवार याच्यासोबत आहेत. राजभवनातून टीव्हीवर दिसणाऱ्या सर्वांनी शरद पवार यांच्याकडे आम्ही गोंधळलेलो होतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले आहे. गेलेल्या आमदारांशी आमची चर्चा सुरु आहे, असे राष्ट्र्वादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्रातील सगळा युवक शरद पवार यांच्या पाठीशी उभा आहे. फोडाफोडीचे राजकारण थांबले पाहिजे, असे ज्यांना वाटते ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील, अशी मला खात्री आहे. पक्ष फोडून आमची ताकद कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केला.

पक्षाच्या मान्यतेशिवाय काही सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा या घटनेला पाठींबा नाही. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ५ तारखेला पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शरद पवार आपली भूमिका स्पष्टपणे मांडतील. जिल्हा-तालुका पातळीवरिल पदाधिकाऱ्यांनाही या बैठकीला बोलवण्यात आले आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button