जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड | पुढारी

जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

पुढारी ऑनलाईन डेस्क : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हालचालींना वेग आला आहे. जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिवाय पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी देखील आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे.  शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीलाही भगदाड पाडण्यात भारतीय जनता पक्षाला अखेर यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपच्‍या  गळाले लागले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राष्‍ट्रवादीला हा मोठा धक्‍का मानला जात आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत देखील उभी फूट पडली आहे. अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले.

त्यांना 40 आमदारांचा पाठिंबा आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्राचे 11 वे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. सत्तानाट्यातील या एकूणच घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शरद पवार पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

हेही वाचंलत का?

Back to top button