‘देवगिरी’वर खलबते, शरद पवार म्‍हणाले, “प्रदेशाध्‍यक्षपदाचा निर्णय …. “ | पुढारी

'देवगिरी'वर खलबते, शरद पवार म्‍हणाले, "प्रदेशाध्‍यक्षपदाचा निर्णय .... "

पुढारी ऑलाईन डेस्‍क : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरीमध्ये खलबते सुरू झाल्‍याची चर्चा आहे . याबाबत राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी आज (दि. २) पत्रकार परिषदेत आपले मत मांडले.

यावेळी शरद पवार म्‍हणाले की, मुंबईतील बैठकीची मला काेणतीही कल्‍पना नाही. विराेधी पक्ष नेता म्‍हणून अजित पवार यांना देवगिरीवर बैठक घेण्‍याचा अधिकार आहे.  ६ जुलै राेजी पक्षाच्‍या प्रमुख नेत्‍यांची बैठक आहे. या बैठकीत प्रदेशाध्‍यक्षपदाचा निर्णय हाेण्‍याची शक्‍यता आहे.  प्रदेशाध्‍यक्षपदाचा निर्णय मी एकटा घेणार नाही. यासाठी सर्वांचा मतांचा विचार केला जाईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

तुम्‍ही प्रदेशाध्‍यक्षदी कोणाची निवड होणार यावर विचारणा करत आहात. मी आताच नाव सांगितले तर ती हुकूमशाही होईल. कारण याबाबत मी एकटा निर्णय घेणार नाही. ६ जुलै रोजी याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्‍यांनी सांगितले.

 

Back to top button