मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आज मेगा ब्‍लॉक | पुढारी

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आज मेगा ब्‍लॉक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा उपनगरीय रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकरिता आज (रविवार), २ जुर्ले रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान दुरुस्ती करण्यात येणार आहे.

माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यत दुरुस्ती करण्यात येणार आहे. या दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील लोकल गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यत दुरुस्ती करण्यात येणार आहे. परिणामी वाशी ते पनवेल दरम्यानची लोकल वाहतूक पुर्णपणे बंद असणार आहे. ब्लॉक कालावधीत ट्रान्स हार्बर मार्गावरील नेरुळ ते पनवेल लोकल सेवा बंद राहणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते वाशी दरम्यान स्पेशल लोकल चालिवण्यात येणार आहेत.

परेचा जम्बोब्लॉक

रविवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यत अप आणि डाउन धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. तसेच काही लोकल गाड्या रद्द केल्या आहेत.

हेही वाचा : 

Back to top button