Diwali holidays : मंत्रालय कर्मचारी निघाले १० दिवसांच्या दिवाळी सुटीवर

Diwali holidays : मंत्रालय कर्मचारी निघाले १० दिवसांच्या दिवाळी सुटीवर

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या संकटामुळे दीड वर्षानंतर आता कुठे पूर्ववत सुरू झालेला मंत्रालयातील कारभार दिवाळीच्या काळात पुन्हा ठप्प होणार आहे. दिवाळीच्या तीन दिवसांच्या सुट्टीला जुळून आलेल्या शनिवार रविवारच्या साप्ताहिक रजेचा लाभ घेण्यासाठी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी 1 ते 3 नोव्हेंबर अशा रजांसाठी अर्ज मंजूर करून घेतले आहेत. कोरोना कालावधीत मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना दीड वर्षे भरपगारी रजा मिळाली होती. (Diwali holidays)

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आठवड्यातून दोन दिवसच कामावर येण्याची मुभा मिळाली होती. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून मंत्रालय अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या 100 टक्के उपस्थितीत सुरू झाले होते. पण ही दिवाळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी दहा दिवसांच्या रजेची बंपर घेऊन आली आहे. 4 नोव्हेंबरला नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे, 5 नोव्हेंबरला दिवाळी पाडवा, तर 6 नोव्हेंबरला भाऊबीज आहे, अशी तीन दिवस दिवाळीची सुट्टी (Diwali holidays) आहे.

त्यानंतर 7 नोव्हेंबरला शनिवार आणि 8 नोव्हेंबरला रविवार अशा दोन साप्ताहिक सुट्या आहेत. यात काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी हुशारी दाखवली आहे. 1 ते 3 नोव्हेंबर अशी तीन दिवसांची सुट्टी घेतली आहे. त्यामुळे 30 ऑक्टोबरला शनिवार आणि 31 ऑक्टोबरला रविवार अशा दोन सुट्ट्याही जोडून घेतल्या आहेत. यामुळे दहा दिवसांची दिवाळी बंपर मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना मिळाली आहे.

1 ते 3 नोव्हेंबर अशी तीन दिवसांची सुट्टी घेतल्यानंतर सलग दहा दिवसांची सुट्टी मिळत आहे. यामुळे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी 1 ते 3 नोव्हेंबर या तीन दिवसांच्या रजेसाठी आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे अर्ज करून मंजूर करून घेतले आहेत. मंत्रालयातील सर्वच विभागात अशा सुट्टीसाठी अर्ज केले आहेत.'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news