MumbaiRains : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी; मोसमी पावसाची आजही प्रतीक्षाचं! | पुढारी

MumbaiRains : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी; मोसमी पावसाची आजही प्रतीक्षाचं!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा  MumbaiRains मुंबई शहर व उपनगरात आज (शनिवार) पहाटेपासून मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे सकल भागात पाणी साचले होते. मात्र याचा शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला नाही. मध्य व पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवाही वेळापत्रकानुसार सुरू होती.

मुंबई व उपनगरात आज पडलेल्या MumbaiRains पावसामुळे मान्सून दाखल झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र मान्सून येत्या दोन ते तीन दिवसात दाखल होईल, असे वेधशाळेकडून सांगण्यात येत आहे. मुंबई शहर व उपनगरात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे दादर, सायन, अंधेरी, सांताक्रुझ, बोरीवली, गोरेगाव, कुर्ला आदी ठिकाणी सकल भागात पाणी साचले होते. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांची चांगली धावपळ उडाली.

सीएसएमटीसह दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला, बांद्रा टर्मिनस आदी ठिकाणी बाहेरगावावरून आलेल्या प्रवाशांना भिजतच आपले घर गाठावे लागले. मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्या वेळापत्रकानुसार सुरू होत्या.MumbaiRains  पश्चिम द्रुतगती महामार्गासह पश्चिम उपनगरातील एस. व्ही. रोड सकाळी काही प्रमाणात वाहतूक कोंडी होती. मात्र अन्य ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू होती.

सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे…

शहर – 11.61 मिमी
पूर्व उपनगर – 15.28 मिमी
पश्चिम उपनगर – 9.93 मिमी

हेही वाचा : 

Back to top button