भाजप मोठ्या राज्यात कुठेही नाही; मग धसका का घ्यायचा ? संजय राऊत

संजय राऊत ( संग्रहित छायाचित्र)
संजय राऊत ( संग्रहित छायाचित्र)

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप तेलंगणात नाही, जम्मू-काश्मीर, राजस्थान, ओरीसा, पंजाबमध्ये नाही मग भारतीय जनता पार्टी कुठे आहे. महाराष्ट्रात तर  भाजप अजिबात नाही. नेमका भाजप कुठे आहे. भारतीय जनता पक्षाचा धसका घेण्याचे अजिबात कारण नाही. या प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदी आणि भाजपचा तेथील लोकांनी दारुण पराभव केला आहे. त्यामुळे मोदी जगाचे काय भारताचेही नेते नाही आहेत, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी मुंबई येथे शिवसेनेच्या शाखाप्रमुखांच्या बैठकी दरम्यान केले. वाचा सविस्तर बातमी

संजय राऊत मुंबई येथे शिवसेनेच्या शाखाप्रमुखांच्या बैठकी दरम्यान बोलत असताना म्हणाले की, "जे स्व:ताला हिंदुत्ववादी नेते समजतात, आम्ही एकमेव हिंदुत्वाचे रक्षण करणारे आहोत. कर्नाटकात हिंदू नाही आहेत का? सर्वात जास्त हिंदू कर्नाटकात आहे. तामिळनाडू, केरळ, राजस्थानमध्ये हिंदू नाही आहेत का? ज्या ज्या ठिकाणी भाजपचा दारुण पराभव झाला तिथे-तिथे हिंदुची मंदिरे आणि संस्कृती जतन करणारे लोक आहेत. मग तेथिल जनतेने मोदींचा पराभव का केला."

संजय राऊत : अख्ख सरकारच बेकायदेशीर आहे

वांद्रे भागातील शिवसेनेच्या शाखेवर BMC ने  थेट बुलडोझर चालवला. ही शाखा मातोश्री निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावर आहे. तर ही शाखा तोडताना ती अनिधिकृत असल्याचा दावा BMC ने केला होता. यावर बोलत असताना ते म्हणाले," शिवसेनेची  शाखा तोडली. शिवसेनाप्रमुखांच्या फोटोवरही हातोडा फिरवला. काय तर म्हणे बेकायदेशीर आहे. पण अख्ख सरकारच बेकायदेशीर आहे. त्याच्यावर आम्ही हातोडा मारू. महानगरपालिका, पोलिस जर या बेकायदेशीर सरकारचा आदेश पाळत असेल तर त्यांना उद्या जाब विचारू. बेकायदेशीर सरकराचे बेकायदेशीर आदेश पाळणे घटनाबाह्य आहे, असे म्हणत त्यांनी भाजपसह सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news