Stock Market Closing | सेन्सेक्स ६३ हजारांखाली, मिड, स्मॉलकॅप्स घसरले, जाणून घ्या आजचे ट्रेडिंग

Stock Market Closing | सेन्सेक्स ६३ हजारांखाली, मिड, स्मॉलकॅप्स घसरले, जाणून घ्या आजचे ट्रेडिंग
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या सत्रात घसरण झाली. आज सेन्सेक्स २५९ अंकांनी घसरून ६२,९७९ वर बंद झाला. तर निफ्टी १०५ अंकांच्या घसरणीसह १८,६६५ वर स्थिरावला. आयटी, मेटल या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. मेटल, ऑईल अँड गॅस, पॉवर, कॅपिटल गुडस, आयटी आणि PSU बँक १ ते २ टक्क्यांनी घसरले, तर ऑटो, रियल्टी आणि FMCG प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी खाली आला. आज सुमारे १,१४७ शेअर्स वाढले, तर २,२२८ शेअर्स घसरले आणि १३८ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. (Stock Market Closing)

निफ्टीवर अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, बीपीसीएल, हिंदाल्को इंडस्ट्रीज आणि डिव्हिस लॅब्स हे टॉप लूजर्स होते. तर इंडसइंड बँक, डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज, भारती एअरटेल, एशियन पेंट्स आणि एनटीपीसी यांचे शेअर्स वाढले.

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३३० अंकांनी घसरून ६२,९०८ वर तर निफ्टी १८,७०० च्या खाली आला. मुख्यतः आजच्या ट्रेडिंगमध्ये आयटी स्टॉक्समध्ये घसरण झाली. काल सेन्सेक्स ६३,२३८ वर बंद झाला होता. आज शुक्रवारी तो ६३,१२४ वर खुला झाला. त्यानंतर सेन्सेक्स ६२,८७४ पर्यंत खाली आला.

सेन्सेक्सवर आज टाटा मोटर्स, एसबीआय, पॉवर ग्रिड, टाटा स्टील, इन्फोसिस, एलटी, अल्ट्राटेक, टायटन, रिलायन्स, अॅक्सिस बँक, मारुती, बजाज फायनान्स हे शेअर्स घसरले. तर इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, एनटीपीसी, एचडीएफसी, एचसीएल टेक, सन फार्मा हे शेअर्स वाढले. अदानी समुहातील शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले.

अदानींचे शेअर्स गडगडले

अदानी समुहातील (Adani Group stocks) कंपन्यांचे शेअर्स आज १० टक्क्यांपर्यंत घसरले. न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन येथील यूएस अॅटर्नी कार्यालयाने अलीकडच्या काही महिन्यांत अदानी ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या गुंतवणुकीबाबत चौकशी सुरु केली आहे. अदानी समूहाने गुंतवणूकदारांना नेमकं काय सांगितले याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे, असे ब्लूमबर्गने रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, अदानी समूहाने या वृत्ताचे खंडन केले आहे. या पार्श्वभूमीवर अदानींचे शेअर्स गडगडले आहेत. अदानी एंटरप्रायझेसचा (Adani Enterprises) शेअर ७ टक्के घसरून २,२२३ रुपयांवर आला. तर अदानी पोटर्सचा शेअर ४ टक्क्यांहून अधिक खाली आला. अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर, एसीसी, अंबुजा सिमेंट, एनडीटीव्ही हे शेअर्सही घसरले.

इरॉस इंटरनॅशनलला मोठा फटका

इरॉस इंटरनॅशनल मीडिया लिमिटेडचे शेअर्स (Shares of Eros International Media) आज तब्बल १९.९२ टक्क्यांनी घसरले. गेल्या चार वर्षांतील इरॉसचे हे मोठे नुकसान आहे. बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने लेखा अनियमिततेमुळे कंपनी आणि त्यांच्या व्यवस्थापनावर कारवाई केल्यानंतर इरॉस शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. SEBI ने इरॉस इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक सुनील लुल्ला आणि कंपनीशी संबंधित तीन संस्थांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये सहभाग घेण्यापासून प्रतिबंधित केले आहे.

आशियाई बाजारात घसरण

आशियाई बाजारात शुक्रवारी घसरण झाली. वाढती महागाई आणि मध्यवर्ती बँकांच्या व्याजदराबाबतच्या भूमिकांमुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. जपानमधील निक्केई १.४५ टक्के घसरला. चीनचा शांघाय कंपोझिट १.३१ टक्के आणि हाँगकाँगचा हँग सेंग २.१ टक्के घसरला.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news