सरकारी अधिकाऱ्यांच्या जम्बो बदल्यांमध्ये गैरव्यवहार : अंबादास दानवे | पुढारी

सरकारी अधिकाऱ्यांच्या जम्बो बदल्यांमध्ये गैरव्यवहार : अंबादास दानवे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या जम्बो बदल्यांमध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिवसाढवळ्या न काढता महसूल विभागाने बदल्यांचे आदेश पहाटे २ ते ४ या वेळेत काढले आहेत. तसेच याबाबतची माहिती संबंधीत अधिकाऱ्यांच्या व्हाट्सअपवर दिले, अशी माहिती देत दानवे यांनी सरकारला संशयाच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

महसूल, वन, कृषी आणि उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून यात मोठया प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला आहे.सद्या शासन आपल्या दारी आणि अधिकारी मंत्र्यांच्या घरी हा प्रकार चालू असल्याची टीकाही दानवे यांनी केली. वन विभागातील बदल्यांबाबत भाजपच्याच ४ आमदारांनी तक्रार केल्यानंतर त्या बदल्या थांबविण्यात आल्या. कृषी विभागाच्या सचिवांनी बदल्या होऊ शकत नाही, सदर बदलीस ते अधिकारी पात्र नाही, असा शेरा मारला असतानाही अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. तर उत्पादन शुल्क विभागात वर्ग ३ व वर्ग ४ चे अधिकार सचिवांकडे असताना मंत्र्यांनी बदल्या केल्या असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

Back to top button