राज्य सरकारच्या दोन निर्णयांमुळे एसटीला अच्छे दिन; मे महिन्यात तब्बल ९१३ कोटीचे उत्पन्न | पुढारी

राज्य सरकारच्या दोन निर्णयांमुळे एसटीला अच्छे दिन; मे महिन्यात तब्बल ९१३ कोटीचे उत्पन्न

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आर्थिक तोट्यातील एसटीला अमृत महोत्सवी जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांच्या ५० टक्के प्रवासामुळे तारले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात एसटीला ६०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.त्यात यंदाच्या मे महिन्यात तब्बल ३१३ कोटी रुपयांनी वाढ झाल्याने एकुण उत्पन्न ९१३ कोटीपर्यत पोहोचले आहे. तर २५० पैकी ११३ डेपो आर्थिक फायद्यात आले आहेत.यात मुंबई विभागातील कुर्ला नेहरु नगर आणि परळ या दोन डेपोचा देखील समावेश आहे.

पुर्वीपासून तोटयात असलेली एसटी कोरोना आणि त्यानंतर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपामुळे डबघाईला आली होती. गेल्या वर्षी मे महिन्यापासून राज्यातील एसटीची वाहतुक सुरळित सुरु झाली.परंतु प्रवासी संख्या रोडावल्यामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ होत नव्हती. त्यामुळे एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर देण्यासाठी राज्य सरकारच्या आर्थिक मदतीवर अवलंबून रहावे लागत आहे.

गेल्या वर्षी मे महिन्या सरासरी १९ कोटी याप्रमाणे महिन्याभरात ६०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यात यंदाच्या मे महिन्यात घसघशीत वाढ झाली आहे. यंदा उन्हाळी सुट्टीमुळे गाड्यांना प्रचंड गर्दी होती. यंदाच्या मे महिन्यात गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत ३१३ कोटी रुपयांची वाढ झाली. यामुळे दिवसाचे उत्पन्न ३०कोटी पर्यत पोहोचल्याने मे महिन्याचे एकुण उत्पन्न ९१३ कोटी रुपयांपर्यत पोहोचले आहे.

एसटीच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी राज्य सरकारने घेतलेले दोन महत्वपुर्ण आणि क्रांतिकारी निर्णय़ कारणीभूत आहेत. ७५ वर्ष पूर्ण झालेल्या अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास आणि महिलांना सरसकट सर्व बसमध्ये ५० टक्के तिकिट दरात सवलत या दोन योजनांमुळे एसटीला अच्छे दिन आले आहेत.

एसटी महामंडळाच्या उत्पन्नाची आकडेवारी (सर्व आकडे कोटीमध्ये)

वर्ष——एकुण उत्पन्न———प्रत्यक्ष उत्पन्न—सवलतीची रक्कम——दररोजचे उत्पन्न

मे २०२२———-६०१ ————५३७——————–६४—————१९.३५

मे २०२३———९१३————-५७८—————–३२६—————–२९.५०

फरक———३१२———-५०————–२६२————-१०.२

——————-

खर्चाचा तपशील

वर्ष———–एकुण खर्च—-वेतन—–ईंधन—–प्रवासी कर——–टोल——–ईतर

मे २०२२——–८७८———–३२६——३५०——-८४——–१८——–१००

मे २०२३——९२३————३४५———३४१———९३———२०———१२४

Back to top button