Stock Market Updates | सेन्सेक्स, निफ्टी सर्वकालीन उच्चांकाजवळ | पुढारी

Stock Market Updates | सेन्सेक्स, निफ्टी सर्वकालीन उच्चांकाजवळ

पुढारी ऑनलाईन : जागतिक संकेत कमकुवत असतानाही भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) आज सोमवारी तेजीत सुरुवात केली. बाजारातील तेजीत एचडीएफसी आणि आयटी स्टॉक्स आघाडीवर राहिले. दोन्ही बेंचमार्क निर्देशांक सर्वकालीन उच्चांकाजवळ व्यवहार करत आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १७९ अंकांनी वाढून ६३,५६३ वर गेला. तर निफ्टी १८,८३२ वर होता. त्यानंतर सकाळी १० च्या सुमारास दोन्ही निर्देशांक सपाट झाले.

सेन्सेक्सवर बजाज फिनसर्व्ह, टायटन, बजाज फायनान्स, एल अँड टी, सन फार्मा, नेस्ले इंडिया, टाटा स्टील, एचडीएफसी, टीसीएस, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, एशियन पेंट्स, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, टाटा मोटर्स हे शेअर्स वधारले आहेत. तर एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय, इंडसइंड बँक, कोटक बँक, रिलायन्स, विप्रो हे शेअर्स घसरले आहेत.

क्षेत्रीय निर्देशांकात निफ्टी हेल्थकेअर, निफ्टी फार्मा, ऑटो, फायनान्सियल, एफएमसीजी, आयटी, मेटल आणि रियल्टी हे वाढले आहेत.

परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदीचा ओघ कायम

एनएसईच्या आकडेवारीनुसार परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी ७९५ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ६८१ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. गेल्या ४ सत्रांत परदेशी गुंतवणूकदारांनी ७,२७२ कोटींची गुंतवणूक केली आहे. यामुळे बाजारात तेजी कायम राहिली आहे.

Back to top button