

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Wari 2023) श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज (दि. १४) येथे देण्यात आले.
यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह समितीचे सदस्य अॅड. माधवी देसाई- निगडे, प्रकाश जवंजाळ, शंकुतला नडगिरे आदी उपस्थित होते. समितीच्यावतीने (Ashadhi Wari 2023) मुख्यमंत्री शिंदे यांचा श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन तसेच पारंपरिक पद्धतीने सत्कारही करण्यात आला.
हेही वाचा